पालेभाज्यांमध्ये अनेक भाज्या आहेत ज्या स्वतःमध्ये पौष्टिक घटक दडवून ठेवणारा , चव आणि पौष्टिकतेने समृद्ध, तुम्ही आम्ही ते खाण्यापासून टाळाटाळ करत असतो असा हा – शेवगा.
शरीरातील जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता दूर करण्याचे काम करणारा- शेवगा. पानांची आणि फुलांची- केली जाणाऱ्या भाजीमधून, शेंगा(drumstick) बनवलेणारे- भाजी किंवा सांबार, डाळ,इ.मधून. पण याचे फायदे फार कमी लोकांना माहित आहेत.
• मॉरिंगा अॉलिफेरा Moringa oleifera or ड्रमस्टिक Drumstick
गुणधर्म
• अँटि-ऑक्सिडंटAnti-oxidants, अँटि-डायबेटिक अँटि-इंफ्लेमेटरी, अँटी-बायोटिक, अँटी-व्हायरस, अँटी-एजिंग, अँटी-फंगल, anti cancer, एनाल्जेसिक analgesic
१.रोगप्रतिकारक (Immunity) शक्ती वाढवणे
• शेवग्याची पाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात त्यांचे कारण पानांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्याकारणाने. शेवग्याच्या शेंगांमध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन सीमुळे थकवा दूर होण्यास मदत होते.
• व्हिटॅमिन बी शरीरात दीर्घकालीन ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करत असतात.
२.पचन (Digestion) कार्य व्यवस्थित होते
• शेवग्याच्या पानांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याकारणामुळे पचनासंबंधी समस्या दूर राहण्यास मदत होते व शरीरास आवश्यक पोषक घटक मिळतात. शेवग्या आणि नारळ पाण्याचे एकत्र सेवन केल्याने जुलाब, कावीळ सारखे आजार बरे होतात.
• चयापचय वाढवण्यास प्रोत्साहन देतात.
३. डोळ्यांचे (Eye) आरोग्य सुधारण्यास मदत होते
• डोळ्याच्या आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी शेवग्याच्या पानांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए दृष्टीदोष दूर करण्यास मदत करते.
४. स्मृती (Memory ) आणि मेंदूचे (Brain) आरोग्य चांगले राहते
• शेवग्याची पानं अँटिऑक्सिडंट कार्याचे समर्थन करत असल्यामुळे न्यूरॉन सिस्टीम वर निरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव टाकतात.
५. यकृताचे ( Liver) कार्य सुधारते
६. रक्तात साखरेचे (Blood sugar) प्रमाण स्थिर ठेवण्यात मदत
• शेवग्याच्या पानांमध्ये कमी ग्लासेमिक आणि फायबर जे मधुमेहासाठी फायदेशीर ठरते ते कसे शेवग्याच्या पानांमध्ये विरघळणारे फायबर रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात, पण असं गैरसमज वाळगू नका की मधुमेह बरा होतो.
• उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास शेवग्याच्या पानांचा रस काढून प्यायल्याने हाय बीपीच्या (Blood pressure) रुग्णांना फायदा होतो त्याचबरोबर रक्त शुद्ध (Blood purification) होते.
७. लोहाचे (Iron) प्रमाण जास्त असते
• शेवग्याच्या शेंगा खाल्ल्यमुळे हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि रक्ताची कमतरता दूर होते.
• शेवग्याच्या शेंगांमध्ये पालकापेक्षा २५ पट जास्त प्रमाणात लोह आढळते.
८. कॅल्शियम (Calcium)
• दुधापेक्षा १७ पट जास्त कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
९. संक्रमणातून होणाऱ्या आजारांपासून
• शेवग्याच्या शेंगा आणि पानांमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे अँटी फंगल आणि अँटिव्हायरस गुणधर्म आढळतात, त्यामुळे त्वचे संबंधित होणाऱ्या संक्रमणापासून बचाव करते.
• अँटीबॅक्टीरियल असल्यामुळे शेवगा गळा, त्वचा, छातीत होणाऱ्या संक्रमणापासून (इ. खोकला) बचाव करते. दम्यावर सुद्धा प्रभावी.
१०. तोंड येणे (Mouth ulcer)
• शेवग्याच्या पानांमध्ये बी जीवनसत्व जास्त प्रमाणात असल्यामुळे तोंड येण्याच्या आजारावर शेवग्याच्या पानांचा आहारातून सेवन लाभदायक ठरत आहे.
११. लठ्ठपणा कमी करण्यास मदत
• शेवग्याच्या शेंगांमध्ये लठ्ठपणा आणि चरबी दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाणारे फॉस्फरसचे प्रमाण मुबलक असल्यामुळे शरीरातील अतिरिक्त कॅलरीज (Calories) कमी करत आहेत, तसेच शेवग्याच्या फुलांमध्ये क्लोरोजेनिक अॅसिड नावाचे अँटिऑक्सिडंट असते याच्या सेवनाने अतिरिक्त चरबी जळून जाते.
१२. शेवगा फुले महिलांसाठी खूप फायदेशीर
• आईचे दूध वाढवण्यास त्याचबरोबर महिलांना होणारे युरीन इन्फेक्शन यासाठी, थकवा अशक्तपणा दूर करण्यासाठी, केस गळणे थांबवून कोरडेपणा दूर करुन केसांची चमक वाढवण्यास शेवग्याची फुलं खूप फायदेशीर आहेत.
शेवगा संधिवात, थायरॉईड, दमा, कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती, मधुमेह, वेटलॉस, किडनी स्टोन, हृदयरोग, कर्करोग, कोलेस्ट्रॉल, इ. सर्व आजारांवर प्रभावी.
शेवगा कोणत्या व्यक्तीने खाऊ नये
• ज्या रुग्णांना कमी रक्तदाबाचा त्याचबरोबर रक्तस्त्राचा विकार आहे त्यांना लो ब्लड प्रेशर, हाय बीपीचा धोका वाढतो.
• गर्भवती महिलांने शेवगा खाल्ल्याने गर्भपात होण्याचा धोका वाढतो.
• शेवगा जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात पित्त वाढू शकते.
• शेवग्याच्या पानांच्या भाजीचे अतिसेवन केल्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनची समस्या निर्माण होऊ शकते.
• कोणत्याही प्रकारची एलर्जी असलेल्यांनी शेवग्याच्या पानांची भाजी खाणे शक्यतो टाळा.
• शेवग्याच्या पानांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण लक्षात घेऊन त्याचे सेवन करा.
• अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे कर्करोग टाळू किंवा बरा होऊ शकत नाही.
टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.