तुमचा निष्काळजीपणा शरीरासाठी कसा पडेल भारी
1)पोट :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही वेळेत खात नाही…
म्हणजे खाण्याकडे लक्ष नाही.
2)मूत्रपिंड :- केव्हा बिघडतात,
जेव्हा तुम्ही २४ तासात २/३ लिटर पाणी पीत नाही…
म्हणजे पाणी पिण्याकडे लक्ष नाही.
३) पित्ताशय :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही रात्री लवकर ११ च्या आत झोपत नाही आणि सकाळी सूर्योदया पूर्वी उठत नाही….
म्हणजे ७ ते ८ तासाची झोप पूर्ण होत नाही.
४) लहान आतडे :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही थंड आणि शिळे अन्न खाता…
म्हणजे तुम्ही काय खाता या कडे लक्ष नाही.
५) मोठे आतडे :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही तुमच्या आहारात तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता…
म्हणजे तुम्ही फळे, पालेभाज्या, उकडलेले कडधान्य खाण्यावर लक्ष देत नाही.
६) फुफ्फुसे :- केव्हा बिघडतात,
जेव्हा तुम्ही धूर, धूळ असलेल्या आणि कंपन्या-गाडीतून निघणारा विषारी वायूनी प्रदूषित झालेल्या वातावरणात श्वास घेता आहात ना…
म्हणजे तुम्ही प्रदूषित वातावरणात फिरताना मास्क लावत नाही.
७) यकृत :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही तळलेले, जंक आणि फास्ट फूड खाता…
म्हणजे यकृत पोषक तत्वांचा साठा करण्याबरोबरच तुम्हच्या शरीरातील टॉक्जीन शरीरातून काढून टाकण्याची भूमिका करत नाही.
८) हृदय :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही जास्त मीठ असलेले व चरबीयुक्त, रिफाइंड तेल अशा प्रकारचा आहार नेहमी घेत असल्यास ….
म्हणजे तुम्ही जास्त तेलयुक्त आणि मीठ असलेले पदार्थ खाणे टाळत नाही.
९) स्वादुपिंड :- केव्हा बिघडते,
जेव्हा तुम्ही सहज मिळतात व चविष्ट लागतात म्हणून जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाता…
म्हणजे तुम्ही अति गोड खाणे टाळत नाही.
१०) डोळे :- केव्हा खराब होतात,
जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल, टीव्ही व कॉम्प्युटर वर काम करत असताना….
म्हणजे डिजिटल च्या युगात तुम्ही काम करताना डोळ्यांची काळजी घेत नाही.
११) मेंदू :- केव्हा बिघडतो,
जेव्हा तुम्ही नकारात्मक विचार करता….
म्हणजे नकारात्मक गोष्ठींचा विचार करणे सोडत नाही.
आपल्या शरीराच्या “अवयवाची” योग्य ती “काळजी” घ्या.
रोज सकाळी योग, प्राणायाम, व्यायाम करा.
आपल्या शरीराची काळजी घ्या आनंदी रहा.
संपत्तीपेक्षा शरीराचे संरक्षण जास्त केले पाहिजे कारण शरीर बिघडल्यानंतर त्याचे संरक्षण पैशानेही होत नाही.
“शरीराचे” कोणतेही “अवयव” हे बाजारा मध्ये मिळत नाहीत.
अवयवदान करणाऱ्या किंवा एखाद्य व्यक्तीचा अवयव चुकून मिळाला तरी खूप महाग.
आणि ते अवयव आपल्या शरीरात योग्य त्या रित्या सुट होऊन बसतीलच असे नाही म्हणून आपल्या
“शरीरातील अवयवांची” नेहमी योग्य ती काळजी घेत राहणे आवश्यक आहे.